Friday 20 January 2023

शारीरिक शिक्षण

शारीरिक शिक्षण

मुलामुलींच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकासासाठी आनंददायी, गतिमान व क्षमतावर्धक अशा शारीरिक हालचालींद्वारे नियोजनपूर्वक दिले जाणारे शिक्षण. हालचाल हा शारीरिक शिक्षणाचा पाया असून शरीर हे शारीरिक शिक्षण प्राप्त करण्याचे प्रमुख माध्यम आहे. असे असले, तरी शारीरिक शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ शरीरापुरतेच मर्यादित नाही; तर शरीराबरेबरच मन, भावना, विचार इत्यादींवर होणारे संस्कारसुद्धा त्यात अंतर्भूत आहेत.

विविध शारीरिक हालचालींद्वारे व्यक्तीला मिळणाऱ्या अनुभवाचे संघटित ज्ञान म्हणजे शारीरिक शिक्षण, अशी व्याख्या डी. ओबर्ट्युफर यांनी केली आहे. शारीरिक शिक्षण हा एका मोठ्या समग्र अशा विषयाचा एक भाग असून त्याचा संबंध महत्त्वाच्या स्नायूंच्या हालचालींशी आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या क्रियांशी आहे. अशी व्याख्या डॉ. जे. बी. नॅश यांनी केली आहे. 'महत्त्वाच्या स्नायु-हालचालींमधून मिळणाऱ्या परिपूर्ण अनुभवाद्वारे बालकाची सर्वाधिक अंतिम टप्प्यापर्यंतची वाढ व विकास साधणाऱ्या प्रक्रिया -समुच्चयास शारीरिक शिक्षण असे म्हणतात', अशी कल्पना ब्राउनेल यांनी मांडलेली आहे. 'शारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन व आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे, म्हणजे शारीरिक शिक्षण होय', अशी व्याख्या भारताच्या केंद्रीय शारीरिक शिक्षण व मनोरंजन सल्लागार मंडळाने केलेली आहे.

शारीरिक शिक्षणाची उद्दिष्टे : शारीरिक शिक्षण व मनोरंजनाच्या आराखड्यामध्ये शारीरिक शिक्षणाची पुढील उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत :

कार्यक्षमतेचा विकास

इंद्रियविकास आणि शरीराची सुदृढता यांवर शरीराची कार्यक्षमता अवलंबून असते. इंद्रियांचा विकास कृतिपूर्ण परिश्रमातून होतो आणि त्यासाठी लहानपणापासून होणाऱ्या हालचाली कारणीभूत ठरतात. इंद्रियांना पोषक ठरणाऱ्या व त्यांची कार्यक्षमता वाढवणाऱ्या हालचाली शिकवणे, हे शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट.

मज्जासंस्था व स्नायुसंस्था यांतील सहकार्यात्मक विकास

शारीरिक क्रियांचे कौशल्य वाढवणे, हे शारीरिक शिक्षणाचे दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. लहान मुलांच्या सर्व नैसर्गिक हालचाली प्रयत्नाने आणि सरावाने हळुहळू सफाईदार होत जातात. चालणे, धावणे, उड्या मारणे, फेकणे, झेलणे, शरीराचा तोल सांभाळणे या मूलभूत क्रिया सहजपणे व कौशल्यपूर्ण होणे आवश्यक असते. लहान वयातच मुलांना योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांच्या स्नायू व मज्जासंस्था यांतील सहसंबंध सुधारून वरील मूलभूत क्रिया कौशल्यपूर्ण होऊ शकतात.

व्यक्तिमत्त्वाचा विकास

व्यक्तीचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक विकास साधून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास करणे. हे शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. व्यक्तीचा बांधा, शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. व्यक्तीचा बांधा, शारीरिक ठेवण, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कर्तृत्व आणि कला-गुण यांचा वैशिष्ट्यपूर्ण संघात म्हणजे व्यक्तिमत्त्व होय. यांतील अनेक घटकांचा विकास शारीरिक शिक्षणाने साधला जातो. त्यांतील काही प्रमुख उपघटक पुढीलप्रमाणे :

शारीरिक आरोग्यामध्ये व्यक्तिगत स्वच्छता, व्यायाम, आहार, आरोग्यविषयक सवयी, विश्रांती, मनोरंजन इत्यादींचा समावेश होतो. ह्या सर्व गोष्टी शारीरिक शिक्षणांतर्गत समाविष्ट होतात. मानवी मनावरदेखील शारीरिक शिक्षणाचे योग्य संस्कार होतात. शारीरिक शिक्षणातील योगाभ्यासाद्वारे मानसिक स्वास्थ्याची प्राप्ती होते. व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य समाजाशी निगडित आहे. म्हणूनच शारीरिक शिक्षणाद्वारे शारीरिक, मानसिक, सामाजिक सुस्थिती साधणे, हे एक उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.

शारीरिक शिक्षणामुळे निर्णयशक्तीचा विकासही साधला जातो. शारीरिक शिणातील विविध क्रीडांमध्ये अनेक वेळा तत्काळ निर्णय घेण्याचे प्रसंग येतात. उदा., कबड्डीमध्ये घोटापकड केव्हा करावी, चढाई वा बचाव केव्हा करावा, या संदर्भात तत्क्षणी चटकन व योग्य निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ होऊ शकते.

भावनांवर नियंत्रण ठेवून त्यांना आवर घालणे, मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हितावह असते. शारीरिक शिक्षणामधील विविध स्पर्धांमधून जयपराजयामुळे व्यक्ती आनंद किंवा दु:ख या भावनांचा अनुभव घेते. सुरुवातीस जरी त्या अधिक जोरदार स्वरूपात व्यक्त झाल्या, तरी हळूहळू खेळाडूंमध्ये त्यांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता प्राप्त होते. संघ किंवा देशासाठी खेळत असताना त्यातून संघनिष्ठा, समाजनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा इ. भावना वाढीस लागतात. भावनांवर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती समाजात योग्य समायोजन साधून आनंदी जीवन जगण्यास लायक बनते.

आत्मविश्वास, सदाचार, धैर्य, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, दया, न्याय, तत्परता, निष्ठा इ. वैयक्तिक गुणांचा विकास शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून होतो. तसेच सहकार्य, बंधुभाव, आदरभाव, सहानुभूती, परोपकारबुद्धी, संघभावना, निष्ठा, खिलाडूवृत्ती, नेतृत्व, आज्ञाधारकपणा, सेवावृत्ती, सत्यप्रियता, शिस्त इ. सामाजिक गुणांच्या विकासाचे धडे ह्या माध्यमातून व्यक्तीस मिळतात.

शारीरिक शिक्षणातील अनेक क्रीडाविषयक बाबी सदाचाराचे तसेच नैतिक मूल्यांचे शिक्षण देतात. क्रीडांगणे ही बालकास सदाचारास प्रवृत्त करून चारित्र्य-घडणीचे काम करतात.

मनोरंजन

व्यक्तीला आनंद, समाधान व स्वास्थ प्राप्त करून देणारी क्रिया म्हणजे मनोरंजन होय. म्हणूनच मनोरंजन हा शारीरिक शिक्षणाचा अविभाज्य भाग होय.

वरील सर्व उद्दिष्टांबरोबरच व्यावसायिक कार्यक्षमतेचा विकास, सहजप्रवृत्तींचा विकास व उदात्तीकरण, व्यक्तीच्या राष्ट्रीयत्वाचा विकास हीदेखील शारीरिक शिक्षणाची इतर महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.

शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम

प्राथमिक स्तरावर इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षण व आरोग्य ह्या विषयांतर्गत अनौपचारिक अनुकरणात्मक हालचाली, कृतियुक्त गाणी, गोष्टी नाट्यीकरण, मनोरंजनात्मक खेळ, कसरतीचे व्यायाम इत्यादी उपक्रमांवर विशेष भर देण्यात येतो. प्राथस्तरामधील विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करून त्यांच्या शरीरावर व विविध अवयवांवर योग्य तो ताबा मिळवून कौशल्य संपादन करण्याच्या दृष्टीने धावणे, फेकणे, उड्या मारणे, साध्या कसरती यांचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात केलेला आहे. तसेच देशी खेळांबरोबरच क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यांसारख्या विदेशी खेळांचा परिचय व्हावा या उद्देशाने या खेळांना स्थान दिलेले आहे. आरोग्यशिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे बालकांना आरोग्यविषयक मूल्यांची सर्वसाधारण कल्पना देऊन आरोग्यविषयक सवयी व कृती अंगी बाणवण्याची सवय वाढीस लावणे व त्यांच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे हे आहे. शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयासाठी एकूण वेळेच्या १/१० भारांश देण्यात आलेला आहे. शिक्षणशास्त्र पदविकाप्राप्त व खेळातील प्रावीण्य संपादन केलेले शिक्षक हा विषय शिकविण्यास पात्र असतात.

उच्च प्राथमिक स्तरावरील इयत्ता ६ वी ते ८ वी च्या शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात विकासात्मक व्यायामप्रकार, मैदानी उपक्रम, मोठे खेळ, तालबद्ध हालचाली, योगासने, कवायत, द्वंद्वात्मक व्यायामप्रकार यांचा समावेश केलेला आहे. देशी खेळांबरोबरच क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यांसारखे विदेशी खेळ, तसेच बीम वर्क, व्हॉल्टींग हॉर्स, जांबिया, लाठी, धनुर्विद्या व जूदो यांचा समावेश इयत्ता ७ वी व ८ वी साठी केला आहे. आरोग्यशिक्षणाचाही त्यात समावेश आहे. एकूण वेळेच्या १/१० भारांश शारीरिक शिक्षण व आरोग्यशिक्षण या विषयांसाठी देण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्यासाठी प्रत्येक वर्गास चार तासांचे नियोजन करावे लागते.

माध्यमिक स्तरावरील इयत्ता ९ वी व १० वी मधील मुलामुलींची उंची झपाट्याने वाढत असते. तसेच समाजमान्यता प्राप्त करणे, नायकत्व करणे, सहकार्याच्या अवधानाचे केंद्र बनणे, अशा प्रवृत्ती त्यांच्यात दिसू लागतात. काहीतरी धाडसी कृत्य करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यासाठी शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये दंड, बैठका, पुलअप्स, मैदानी स्पर्धा, बॅडमिंटन, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, हॅंडबॉल, हॉकी, कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल, टेबल-टेनिस, पोहणे, व्यायामी खेळ, मल्लखांब, योगासने, कुस्ती किंवा जूदो ई. प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. एकूण वेळेच्या १/१० भारांश शारीरिक शिक्षण व आरोग्यशिक्षण या विषयांसाठी देण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्यासाठी प्रत्येक वर्गास चार तासांचे नियोजन करणे आवश्यक असते.

आरोग्य आणि शारीरिक शिक्षणाची परीक्षा ही अंतर्गत असून ती संबंधित शाळांनी घ्यावयाची असते. या विषयात इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेली श्रेणी शाळांनी विभागीय मंडळांस कळवावी लागते. उच्च माध्यमिक स्तरावर (इयत्ता ११ वी व १२ वी) शारीरिक शिक्षण या विषयास आठवड्यातून दोन तासिकांचे नियोजन आहे. इयत्ता ११ वीसाठी ५० गुणांचा हा विषय अनिवार्य आहे; परंतु इयत्ता १२ वीसाठी तो अनिवार्य नाही. महाविद्यालयीन स्तरावर मात्र केवळ शिवाजी विद्यापीठात प्रथम वर्षासाठी १० गुणांची अनिवार्य परीक्षा घेतली जाते. एखाद्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास हे १० गुण ग्रेस गुण म्हणून देऊन त्याला उत्तीर्ण केले जाते. हा अपवाद वगळता केवळ विभागीय, आंतरविभागीय, विद्यापीठीय स्पर्धांपुरतेच ह्या विषयाला स्थान आहे.

शारीरिक शिक्षणाच्या परंपरेची रूपरेखा

राष्ट्रीय स्तरावरील शारीरिक शिक्षणाचा विचार करता त्याचे वैदिक काल व पौराणिक कालखंड (इ.स. पू. २००० ते ६००), मध्युगीन व ऐतिहासिक कालखंड (इ.स.पू. ६०० ते इ.स.१७५०), ब्रिटिश कंपनी सरकार व अव्वल इंग्रजी कालखंड (१७५० ते १९४७) व स्वातंत्र्योत्तर कालखंड (१९४७ नंतर) असे भाग पडतील. वैदिक कालामध्ये स्वसंरक्षण व स्वजातिसंरक्षण यांकरिता सामर्थ्य वाढवण्यासाठी शारीरिक शिक्षणामध्ये युद्धोपयोगी शिक्षण व हालचाली उदा.,धनुर्विद्या, घोडदौड, रथ चालवणे इ. गोष्टींचा समावेश असे. त्याचबरोबर सूर्यनमस्कार, योगविद्या, प्राणायाम यांचाही मानसिक तयारी करण्यासाठी समावेश होतो. मध्युगीन काळात लढाऊवृत्ती टिकवण्यासाठी कुस्ती, मुष्टियुद्ध, अश्वारोहण, भालाफेक, तिरंदाजी इ. बाबींचा समावेश शारीरिक शिक्षणात होता. तसेच शरीरस्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी प्राणायाम, सूर्यनमस्कार, वनविहार इ. व्यायामप्रकार केले जात. विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढतेसाठी शारीरिक व्यायाम हा एक अविभाज्य घटक होता. घोडदौड, नेमबाजी, धनुर्विद्या, कुस्ती, शिकार यांबरोबरच संगीत व नृत्य या कलांचा विकासदेखील ह्या काळात झालेला दिसून येतो. इ.स. १२०० नंतर मुस्लिम राजवटीत सैनिकांना युद्धसज्ज ठेवण्यासाठी घोडदौड, नेमबाजी, तलवारबाजी, कुस्ती, पोहणे, शिकार यांबरोबरच बैल, रेडा, हत्ती यांसारख्या प्राण्यांशी सामना करण्याचे शिक्षण दिले जाई.  छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी युवकांना युद्धाचे, बलसंवर्धनाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आढळते. समर्थ रामदासांनी गावोगावी हनुमान मंदिरे स्थापन केली. त्यांचेच रूपांतर पुढे आखाड्यांत झाले, तिथे दंड, बैठका, सूर्यनमस्कार, वजन उचलणे, कुस्ती, लाठी, दांडपट्टा तसेच ढालतलवारीने, जांबियाने, भाल्याने युद्ध करणे, अशा अनेक युद्धोपयोगी क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण दिले जाई. पेशवे काळातही ही आखाडा-व्यायामपद्धत जपण्यात आली. त्या काळात मल्लविद्या व मल्लखांबाद्वारे शरीर कसदार व घाटदार बनविणाऱ्या व्यायामप्रकारांवर भर दिला जाई.

महाविद्यालयीन पातळीवर विभागीय, आंतरविभागीय स्पर्धा घेऊन त्यातून आंतरविद्यापीठ स्पर्धेकरता संघ निवडला जातो. तो प्रथम विभागवार स्पर्धेत सहभाग घेतो आणि नंतर अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होतो. शारीरिक शिक्षण संचालक म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्ती महाविद्यालयामध्ये शारीरिक शिक्षणातील पदव्युत्तर कोर्स (एम.पी.एड. किंवा एम.पी.ई) पूर्ण केलेल्या असतात. काही महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षण हा ऐच्छिक विषय म्हणून तीनही वर्षांसाठी निवडता येतो. तिथे वरील अर्हताप्राप्त व्यक्तींची शारीरिक शिक्षण अधिव्याख्याता म्हणून नेमणूक केलेली असते.

माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता २५० ते ४०० विद्यार्थिसंख्येसाठी शैक्षणिक अर्हताप्राप्त एका क्रीडाशिक्षकाची नेमणूक करावी, असा आदेश महाराष्ट्र सरकारने काढला आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये प्रथमवर्ष पदवी परीक्षेकरिता १० गुणांची शारीरिक शिक्षण परीक्षा अनिवार्य केलेली आहे. असे काही अपवाद वगळता शैक्षणिक पातळीवर हा विषय दुर्लक्षितच आहे.

शारीरिक शिक्षणाच्या विकासासाठी भारत सरकारने ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था १९५७ साली सुरू केली. तेथे शारीरिक शिक्षणाचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. पीएच.डी. पदवीसाठी संशोधन करण्याची व्यवस्थाही तेथे आहे. पंजाबमधील पतियाळा येथे राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाची १९६१ साली स्थापना करण्यात आली. येथे विशिष्ट खेळातील मार्गदर्शक तयार केले जातात. अशीच केंद्रे नंतर कलकत्ता (कोलकाता), बंगलोर, गांधीनगर (गुजरात) या शहरांत सुरू करण्यात आली आहेत. विशिष्ट खेळातील मार्गदर्शकांसाठी सहा आठवड्यांचा अभ्यासक्रम महाराष्ट्र औरंगाबाद केंद्रावर मे-जून महिन्यांत चालविला जातो.

बी.पी.एड्. ह्या पदवी परीक्षेसाठी क्रीडा-मानसशास्त्र, शारीरिक शिक्षणाचे आयोजन, नियोजन व व्यवस्थापन, शरीरविज्ञान व गतिशास्त्र, खेळांचे नियम व मार्गदर्शनाची तत्त्वे, शारीरिक शिक्षणातील मार्गदर्शन असे विषय आहेत. एम.पी.एड्. या पदव्युत्तर परीक्षेसाठी वरील विषयांसह क्रीडा-वैद्यकशास्त्र, शारीरिक शिक्षणातील संशोधन, योग व योगिक क्रिया ह्यांसारखे इतर विषय नेमलेले आहेत.

ब्रिटिश कालखंडात १८३३ मध्ये मध्यवर्ती सरकारने, तर १८७० मध्ये प्रांतिक सरकारांनी शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली; परंतु त्यामध्ये शारीरिक शिक्षण या विषयास स्थान नव्हते. १९१२ मध्ये मध्यवर्ती सरकारने शारीरिक शिक्षणाकरिता विशेष तरतूद केली. तेव्हापासून फुटबॉल, क्रिकेट यांसारखे खेळ सरकारी शाळांमधून शिकवले जाऊ लागले. १९३५ नंतर तत्कालीन मुंबई इलाख्यातील शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक नेमून शारीरिक शिक्षण देण्यास प्रारंभ झाला.

स्वातंत्र्योत्तर कालखंडात शारीरिक शिक्षणास पंचवार्षिक योजनेत स्थान लाभले. १९४७ ते १९६२ ह्या कालावधीत अनेक समित्यांच्या शिफारशींवरून शारीरिक शिक्षणासाठी प्राथमिक शाळेत वर्गशिक्षक, तर माध्यमिक शाळेत शारीरिक शिक्षणाचे खास प्रशिक्षण घेतलेले शिक्षक नेमले जाऊ लागले. शारीरिक शिक्षणाचा स्वतंत्र अभ्यासक्रम आखण्यात आला. विद्यार्थ्यांच्या क्रीडानैपुण्यास वाव देण्यासाठी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळ्यांवरच्या स्पर्धा आयोजित करून विविध पारितोषिके व शिष्यवृत्त्या देण्याची तरतूद करण्यात आली. पावसाळी व हिवाळी स्पर्धा या नावाने या स्पर्धा ओळखल्या जातात.

महाराष्ट्रामध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने अमरावती शारीरिक शिक्षणाचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी व पदव्युत्तर असे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. कांदिवली येथील शारीरिक शिक्षण प्रशिक्षण संस्था राज्यशासनातर्फे चालवली जात असे. अलीकडील काळामध्ये महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय (पुणे),  श्री अंबाबाई तालीम संस्थेचे डॉ. पद्मसिंह पाटील शारीरिक शिक्षण महाविद्यालय (मिरज) आदी महाविद्यालये शारीरिक शिक्षणातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवितात. वडाळा व बार्शी येथेही शारीरिक शिक्षण महाविद्यालये आहेत. औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक महामंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय तसेच मिलिंद शारीरिक शिक्षण महाविद्यालय कार्यरत आहे.

महाराष्ट्रात अनेक व्यायामशाळांनी शारीरिक शिक्षणाच्या प्रचारप्रसाराचे कार्य पूर्वीपासून केले आहे. यांत अमरावतीचे श्रीहनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, मिरजेची श्रीअंबाबाई तालीम संस्था व भानू तालीम संस्था, पुण्याचे महाराष्ट्रीय मंडळ, दादरचे समर्थ व्यायाम मंडळ, औरंगाबादचे मराठवाडा सांस्कृतिक मंडळ इत्यादींनी खूप मोठ्या प्रमाणावर कार्य केले आहे. श्रीहनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती व श्रीअंबाबाई तालीम संस्था, मिरज या संस्था संपूर्ण भारतभर व्यायाम प्रात्यक्षिकांचे दौरे काढतात. अन्य मंडळांतून खेळाडूंना विविध खेळांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते.

Monday 7 February 2022

*जागतिक सूर्यनमस्कार दिन*

 श्री स्वामी विवेकानद शिक्षण संस्थेचे 

श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी 


सोमवार दि. ७  फेब्रुवार २०२२ 



*जागतिक सूर्यनमस्कार दिन*

*भारतीय तिथी माघ महिन्यातील रथ सप्तमी (शुक्ल सप्तमी); या रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा केला जातो. या दिवशी विविध ठिकाणी सकाळी सूर्योदयाला सुर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केल्या जातात.* सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ योगासने करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो. सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही तथाकथित सूर्य-उपासनाच आहे. हिच्यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतोच पण आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते.हा व्यायम अल्पमोली आणि बहुगुणीआहे असे म्हणतात. सूर्यनमस्कारात बारा आसन पवित्र्यांचा समावेश आहे. ते बारा पवित्रे असे आहेत: 1)प्रणामासन किंवा नमस्कारासन, 2)हस्त उत्तासन, 3)पादहस्तासन, 4)अश्‍वसंचालनासन, 5)पर्वतासन, 6)अष्टांग नमस्कार, 7)भुजंगासन, 8)पर्वतासन, 9)अश्‍वसंचालनासन, 10)पादहस्तासन, 11)हस्त उत्तासन, 12) प्रणामासन हे नमस्कार घालताना, प्रथम सूर्याचे नाव घ्यायचे ‘ओम मित्राय नमः’ आणि मग वरील बारा पवित्रे घ्यायचे. एक नमस्कार पूर्ण झाल्यावर सूर्याचे दुसरे नाव घेऊन दुसरा सूर्यनमस्कार अशी बारा नावे घेऊन बारा नमस्कार घालायचे. ही बारा नावे अशी आहेत: 1) ओम मित्राय नमः 2) ओम सूर्याय नमः 3) ओम खगाय नमः 4) ओम हिरण्यगर्भाय नमः 5) ओम आदित्याय नमः 6) ओम अकार्य नमः 7) ओम रवये नमः 8) ओम भानवे नमः 9) ओम पूष्णय नमः 10) ओम मरिचये नमः 11) ओम सवित्रे नमः 12) ओम भास्कराय नमः साष्टांग नमस्कार श्लोक - उरसा शिरसा द्रष्ट्या वचसा मनसा तथा| पदाभ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामः अष्टांग उच्यते || अर्थ - दृष्टी, मन आणि वाणी संयमीत करुन (एक) छाती, (एक) मस्तक, (दोन) पाय, (दोन) हात, (दोन) गुडघे, या आठांनी जो नमस्कार करायचा त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात.{१} मूळ संपादन करा हिंदू धर्मात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्य हे शैव पंथीय समाजात शंकराचे तर वैष्णव पंथीय समाजात विष्णूचे एक अंग मानले जाते. वेदांमध्ये व पौराणिक ग्रंथांमध्ये सूर्याची उपासना करण्याबद्दल अनेक संदर्भ सापडतात. उगवत्या व मावळत्या सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्कारांचे प्रथम उद्दिष्ट आहे. आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने। जन्मान्तरसहस्रेषु दारिद्ऱ्यं नोपजायते ।। जे साधक दररोज सूर्य नमस्कार करतील, त्यांना सहस्र जन्म दारिद्ऱ्य येत नाही (काहीही कमी पडत नाही) सूर्य नमस्कार हा सर्वागीण व्यायाम आहे. सर्व यौगिक अभ्यासासाठी सूर्योदयाची वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे. त्याचप्रमाणे सूर्य नमस्कारसुद्धा सूर्योदयाच्या समयी घालणे हितकारक आहे. उघड्यावर हवेशीर जागेवर रिकाम्या पोटी सूर्य नमस्कार घालावेत. मन शांत आणि प्रसन्न असल्यावर सर्व योगाभ्यासाचा आपणावर विशेष परिणाम होतो, असे म्हणतात. *सूर्यनमस्कारांतील आसने मंत्र * प्रत्येक सूर्यनमस्काराची सुरुवात करताना प्रणामासनात खालील मंत्र म्हटले जातात. त्या त्या मंत्राचा शरीरातील चक्राशी संबंध आहे, असे म्हणतात. क्र. मंत्र चक्र १ ॐ मित्राय नमः अनाहत चक्र 2 ॐ रवये नमः विशुद्धी चक्र ३ ॐ सूर्याय नमः स्वाधिष्ठान चक्र ४ ॐ भानवे नमः आज्ञा चक्र ५ ॐ खगाय नमः विशुद्धी चक्र ६ ॐ पूष्णे नमः मणिपूर चक्र ७ ॐ हिरण्यगर्भाय नमःस्वाधिष्ठान चक्र ८ ॐ मरीचये नमः विशुद्धी चक्र ९ ॐ आदित्याय नमःआज्ञा चक्र १० ॐ सवित्रे नमः स्वाधिष्ठान चक्र ११ ॐ अर्काय नमः विशुद्धी चक्र १२ ॐ भास्कराय नमःअनाहत चक्र १३ ॐ श्री सवित्रू सुर्यनारायणाय नमः
सूर्यनामांचा क्रम (सिक्वेन्स) लक्षात ठेवण्यासाठी खालिल श्लोकाचा काही जण उपयोग करतात || मित्र रवि सूर्य भानू खग पूष्ण हिरण्यगर्भ| आदित्य च मरिच सवित्रे अर्क भास्कर नमो नमः|| मित्र= जगन्मित्र , रवी= सर्वाना पूजनीय, सूर्य-प्रवर्तक,संचालक, भानू=तेज देणारा, खग= अकाशातून हिंडणारा, पूषा-पोषण करणारा, हिरण्यगर्भ=पोटात तेज असणारा, मरीच=रोगनाशक, आदित्य= सर्वाकर्षक, सविता= सर्व उत्पादक, अर्क= आदरणीय, भास्कर= प्रकाशमान असे याचे अर्थ आहेत.{१} *सूर्यनमस्कार व शरीरसौष्ठव* सूर्यनमस्कार व श्वासोच्छवास सूर्यनमस्कारांत वापरल्या जाणाऱ्या बऱ्याचशा आसनांचा ऐतिहासिक ग्रंथांत उल्लेख आढळतो. साष्टांग नमस्कार हे सूर्यनमस्कारातील एक आसन पुरातनकाळापासून सूर्याला प्रणाम करण्याकरिता वापरले गेले आहे. धेरंड संहितेमध्ये भुजंगासन हे ३२ महत्त्वाच्या आसनांमध्ये गणले गेले आहे. अधोमुक्त श्वानासनाचे वर्णन मल्लपुराणात केले गेले आहे. सूर्यनमस्कारात आरोग्य, दीर्घायुष्य, कार्यक्षमता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचे असते. या आसनामुळे आयुष्य, बल आणि बुद्धिचा विकास होतो. मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरुदंड, पायाची बोटे, गुढगे, सर्व सांधे यांना व्यायाम घडतो. तसेच पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेद, ओटीपोटातील चरबी, थायरॉईडसारखे विकार, लहान मुलांचे फिरलेले हातपाय व हाडांचे काही दोष, गंडमाळा, घशातील विकार नाहीसे होतात. क्षयापासून संरक्षण मिळते, मनोबलाचा विकास होतो. शरीरात शुद्ध रक्ताचा सारख्या प्रमाणात संचार होतो. शिवाजी महाराज व समर्थ रामदास सूर्यनमस्कारांचा वापर शरीरसौष्ठवासाठी करत असत. #जागतिक सूर्यनमस्कार दिन
हार्दिक शुभेच्छा

Monday 8 March 2021

एरोंबिक व्यायाम - माहिती

 

1. एरोबिक व्यायाम (ज्याला कार्डिओ देखील म्हणतात) कमी ते उच्च तीव्रतेचा शारीरिक व्यायामआहे जो प्रामुख्याने एरोबिक उर्जा- निर्मिती प्रक्रियेवर अवलंबून असतो. [१] "एरोबिक" चा अर्थ "विनामूल्य ऑक्सिजनशी संबंधित, समाविष्ट करणे किंवा आवश्यक असणे", [२] आणि एरोबिक मेटाबोलिझमद्वारे व्यायामादरम्यान ऊर्जेच्या मागण्यांसाठी पुरेसे ऑक्सिजन वापरणे होय. []]सामान्यत: एरोबिक चयापचय द्वारे समर्थीत हलके ते मध्यम तीव्रता क्रियाकलाप वेळेच्या कालावधीसाठी केले जाऊ शकतात. [१] सामान्यत: ज्याला एरोबिक व्यायाम म्हणतात त्यास "एकमेव एरोबिक" असे म्हटले जाऊ शकते कारण ते कमी-तीव्रतेसाठी डिझाइन केले गेले आहे जेणेकरून सर्व कार्बोहायड्रेट्स एरोबिक उर्जामध्ये बदलले जातील.

जेव्हा या मार्गाने सराव केला जातो तेव्हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी किंवा एरोबिक व्यायामाची उदाहरणे मध्यम ते लांब पल्ल्याचे किंवा जॉगिंग , पोहणे , सायकल चालविणे आणि चालणे ही आहेत .

आर्किबाल्ड हिल या ब्रिटीश फिजिओलॉजिस्टने १ 22 २२ मध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन वाढ आणि ऑक्सिजन कर्जाची संकल्पना मांडली. []] []] जर्मन चिकित्सक ओटो मेयरहॉफ आणि हिल यांनी स्नायू ऊर्जेच्या चयापचय संबंधित स्वतंत्र कार्याबद्दल 1922 मध्ये फिजिओलॉजी किंवा मेडिसीन मधील नोबेल पुरस्कारसामायिक केला. . []] या कार्यावर आधारित, वैज्ञानिकांनी व्यायामादरम्यान ऑक्सिजनचा वापर मोजण्यास सुरुवात केली. मिनेसोटा विद्यापीठात हेनरी टेलर, 1950 आणि 60 च्या दशकात स्कँडिनेव्हियन शास्त्रज्ञ पे-ओलोफ raस्ट्रँड आणि बेंग्ट सॉल्टिन , हार्वर्ड थकवा प्रयोगशाळा, जर्मन विद्यापीठे आणि कोपेनहेगन स्नायू संशोधन केंद्र यांनी उल्लेखनीय योगदान दिले.[]] []]

शक्ती व्यायाम

2 बळकट व्यायाम आपल्या स्नायूंचा जोरदार वजन वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी प्रसिध्द असतात.तथापि, बळकट व्यायामासाठी आपल्या उपचार लक्ष्ये, खेळ किंवा कार्य यावर अवलंबून भिन्न आवश्यकता आहेत.

आपल्या साध्या रोजच्या कामांमध्ये संयुक्त नियंत्रणासाठी मूलभूत स्नायूंची मजबुती आवश्यक असते. या कार्यांमध्येस्थिर क्रियाकलाप (जसे की बसणे किंवा उभे राहणे) किंवा गतिशील क्रियाकलाप (जसे की चालणे, धावणे, पोहोचणे, उचलणे किंवा फेकणे) समाविष्ट असू शकते. आपणास मजबुतीकरणासाठी आवश्यक असलेल्या कार्ये विशिष्ट मजबुतीकरणाच्या व्यायामाचे पूर्व-निर्धारण करतात जी आपल्याला आपले उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करतात.आपला फिजिओथेरपिस्ट एक तज्ञ आहे जो आपल्याला मार्गदर्शन करू शकतो.

स्नायूंच्या सामर्थ्याव्यतिरिक्त, ज्यामध्ये शक्ती, सहनशक्ती आणि संकुचिततेची गती समाविष्ट असू शकते, स्नायूंच्या आकुंचनची वेळ आणि संतुलन खूप महत्वाचे आहे.

विशिष्ट स्नायू मजबूत करणे आपल्या स्नायूंना खेळायला भिन्न भूमिका आहेत. स्नायू प्रामुख्याने वेगवान गुंडाळी, हळुहळु खिडकी किंवा धीरज-आधारित स्थिरीकरण स्नायू असतात. त्यांच्या भूमिका सर्व भिन्न आहेत म्हणून त्यांच्या विशिष्ट वैशिष्ट्यांनुसार त्यांचा उपयोग केला पाहिजे. उदाहरणार्थ,

स्थिरतेचे स्नायू व्यायाम सहसा कमी तीव्रतेचे असतात- दीर्घ कालावधीचे व्यायाम.

डायनॅमिक बळकट करण्याचे व्यायाम जास्त तीव्रता (वजन, वेग, शक्ती) आणि कमी कालावधी असू शकतात परंतु हे बदलू शकते.

वेग आणि वजन-नियंत्रणाकरिता दोन्ही नियंत्रणासाठी विलक्षण बळकट व्यायाम महत्वाचे आहेत.

प्रत्येक बळकट करणारा व्यायाम आणि तो केला गेलेला वेग वेगवेगळ्या मार्गांनी आपले स्नायू मजबूत करेल. आपल्या गरजेनुसार सर्वात योग्य ताकदीच्या व्यायामास प्राधान्य देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या फिजिओथेरपिस्ट किंवा क्रीडा प्रशिक्षकाशी आपल्या प्रकरणाची चर्चा

3 ताणणे हे काम करण्याचा सर्वात रोमांचक भाग असू शकत नाही, परंतु लवचिकता काम करणे ताकद आणि कार्डिओ वर्क सारख्या गोलाकार फिटनेससाठी आवश्यक आहे. आपल्या वर्कआउट वेळापत्रकात काही ताणण्याचे व्यायाम एकत्रित केल्याने आपल्याला लवचिकता सुधारण्यास मदत होईल, घट्टपणा कमी होईल आणि शेवटी, आपले वर्कआउट अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित होईल.

न्यू जर्सीच्या सिकलरविले येथील प्रोफेशनल फिजिकल थेरपीच्या क्लिनिकल डायरेक्टर साशा सिरेलसन यांनी स्वत: ला सांगितले की, “दैनंदिन कामकाजाच्या वेळी घट्ट स्नायू शेजारच्या सांध्यावर अनावश्यक ताण येऊ शकतात किंवा ते स्वतः जखमी होऊ शकतात.आमचे वय वाढत असताना आपले स्नायू कमी आणि लवचिक बनतात. "आम्हाला आपल्या स्नायूंची लांबी टिकवून ठेवण्यास आणि सुधारित करण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याची आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही वेदना न करता आपल्या क्षमतेचा आनंद घेऊ शकू."

पहा: घट्ट नितंबांसाठी 9 सुलभ ताण

हे खरे आहे की स्ट्रेचिंग मोहक किंवा कडक नाही, आणि कदाचित धाव किंवा एचआयआयटी क्लास आपल्याला देणारी गर्दी देणार नाही."हे अस्वस्थ आहे आणि त्यासाठी वेळ लागतो, म्हणून लोकांना ते करायला आवडत नाही," सायरलसन म्हणतात. "तथापि, स्वत: ला इजा आणि वेदना होण्याचा धोका न घालता आपण फक्त सामर्थ्य प्रशिक्षण आणि कार्डिओ करू शकत नाही." एक असे अनेक कार्य करून जे स्नायूंना संकुचित करतात (जे त्यांना लहान करते) आणि त्यांना कधीच ताणून (वाढवित नाही) आणल्यास आपले स्नायू असंतुलित होतील. शरीरात असंतुलन आपल्या दुखापतीची जोखीम वाढवतात कारण ते योग्यरित्या व्यस्त नसलेल्या इतरांसाठी काही स्नायू आणि सांधे जादा कॉम्पोनेट बनवू शकतात. हे ताण आणि अस्वस्थता ठरतो.

तसेच, जेव्हा आपले स्नायू सैल आणि ताणलेले असतात तेव्हा ते कमी प्रतिबंधित असतात. हे आपणास मोशनची संपूर्ण श्रेणी (रॉम) वर हलविण्यास अनुमती देते. उदाहरणार्थ, आपल्या कूल्ह्यांमध्ये आणि गुडघ्यांमध्ये जास्त प्रमाणात हालचाल केल्यामुळे आपण एका स्क्वॅटमध्ये खोलवर जाऊ शकू. शेवटी, जास्त आरओएम घेतल्याने ते अधिक व्यायाम करण्यास सक्षम होतील आणि त्या योग्यरित्या करतील.

न्यूयॉर्क शहरातील सोल neनेक्सचे प्रशिक्षक आणि ले स्ट्रेच वर्गाचे निर्माते चार्ली अ‍ॅटकिन्स स्वत: ला सांगतात की दररोजच्या जीवनासाठी ताण देणे किती महत्वाचे आहे. "माझ्यासाठी, आपल्या जवळजवळ जुन्या जुन्या कठीण कामांविषयी, जसे जोडा घालण्यासाठी वाकणे, वरच्या मजल्यावर चालणे, आपल्या मुलाला मजल्यापासून उचलणे किंवा अगदी पलंगावरून उठणे यासारखेच आहे." आपली गतिशीलता सुधारणे या दैनंदिन क्रियाकलापांना सुलभ करते - "आपण अधिक मुक्तपणे हलवू शकता," अ‍ॅटकिन्स म्हणतात.

सुदैवाने, आपली लवचिकता आणि गतिशीलता सुधारणे कठीण नाही. यास थोडा वेळ लागेल. स्नायूंचा तणाव दूर करण्यासाठी आणि गतिशीलता वाढविण्यासाठी kटकिन्सने खाली असलेल्या आपल्या लवचिकतेसाठी ताणून टाकण्याचा प्रयत्न करा - जेणेकरुन तुम्ही जिम आणि आयुष्य या दोहोंमधून अधिक मुक्तपणे जाऊ शकता.

o    स्टँडिंग हॅमस्ट्रिंग स्ट्रेच

o    आपले पाय नितंब-रुंदीसह उंच उभे रहा, गुडघे किंचित वाकलेले, आपल्या बाजूंनी हात.

o    डोके, मान आणि खांदे विश्रांती घेत असताना आपण कूल्ह्यांकडे पुढे वाकत असताना आपले डोके खाली फरशीकडे कमी करा.

o    आपले पाय आपल्या मागच्या बाजूला लपेटून ठेवा आणि 45 सेकंद ते दोन मिनिटांपर्यंत कोठेही धरा.

o    आपले गुडघे वाकणे आणि आपण पूर्ण झाल्यावर अप गुंडाळणे.

मान, मागे, glutes, hamstrings, वासरे ताणून

सवाना रुईडी

पिरिफॉर्मिस स्ट्रेच

पिरिफॉर्मिस स्नायू एक खोल अंतर्गत कूल्हे फिरणारे यंत्र आहे, जे बटच्या बाहेरील बाजूला आहे. अ‍ॅटकिन्स म्हणतात की त्याची प्राथमिक भूमिका बाह्य रोटेशन आहे. "खोल आंतरिक फिरवणारे लहान असूनही नितंबांवर बरीच हालचाल घडवतात आणि बर्‍याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते." पिरिफॉर्मिस सायटॅटिक मज्जातंतू ओलांडत असल्याने, “जर ती घट्ट असेल तर याचा परिणाम सायटॅटिक मज्जातंतूमध्ये जलन होऊ शकतो,” सायरलसन म्हणतात. "हा स्नायू ताणल्याने भविष्यातील संभाव्य कटिप्रकाशास प्रतिबंध होऊ शकतो किंवा त्यावर उपचार करण्यात मदत होईल."

o    समोरच्या बाजूला दोन्ही पाय फेकून मजल्यावर बसा.

o    आपला डावा पाय आपल्या डाव्या बाजूस क्रॉस करा आणि आपला उजवा पाय सपाट मजल्यावर ठेवा.

o    आपला उजवा हात आपल्या शरीराच्या मागे मजल्यावर ठेवा.

o    आपला डावा हात आपल्या उजव्या तुडतुडीवर किंवा डाव्या कोपरला आपल्या उजव्या गुडघ्यावर ठेवा (दर्शविल्याप्रमाणे) आणि आपला उजवा पाय डावीकडे दाबा आपण आपला धड उजवीकडे वळवून घ्या.

o    पाठीचा कणा फिरल्यास आपल्या पाठीला त्रास होत असेल तर तो बाहेर काढा आणि आपला डावा हात वापरुन आपला उजवा चतुर्थांश डावीकडे आणि डावीकडे खेचा.

हिप्स, बॅक, ग्लूट्स ताणते

सवाना रुईडी

पाठीचा कणा ट्विस्टसह लंग

अ‍ॅटकिन्स नोट करतात की फिटनेस समुदायामध्ये या ताणला सामान्यतः जगातील सर्वात मोठा ताण (डब्ल्यूजीएस) म्हणून संबोधले जाते. आणि चांगल्या कारणास्तवः "न्यूयॉर्क शहर आणि सिएटलमधील बेस्पोके ट्रीटमेंट्स फिजिकल थेरपीचे कोफाउंडर, डॅन जिओर्डानो, सीपीसीएस, सीएससीएस, म्हणाले की, पवित्राशी संबंधित वेदना किंवा दीर्घकाळापर्यंत बसलेल्या लोकांसाठी मदत करणे आवश्यक आहे. "हे आपले कूल्हे उघडण्यास आणि वक्षस्थानाची (मिड-बॅक) गतिशीलता सुधारण्यास मदत करते," तो स्वत: ला सांगतो.

o    एकत्र आपले पाय घेऊन उभे रहा.

o    आपल्या डाव्या पायासह एक मोठे पाऊल पुढे जा म्हणजे आपण स्तब्ध स्थितीत रहा.

o    आपला डावा गुडघे वाकणे आणि एका पायात पडणे, आपला उजवा पाय सरळ आपल्या मागे आपल्या पायाची बोटं जमिनीवर ठेवून ठेवा, म्हणजे आपल्या उजव्या मांडीच्या पुढील भागाला आपणास ताणणे वाटेल.

o    आपला डावा हात मजल्यावरील ठेवा आणि आपल्या डाव्या हाताची कमाल मर्यादा दिशेने वाढविण्यामुळे आपला वरचा भाग डावीकडे वळवा.

o    30 सेकंद ते 2 मिनिटे धरून ठेवा.

o    दुसर्‍या बाजूला पुन्हा करा.

 

 

 

 

 

 

 

 


एरोबिक व्यायाम
images (1).jpg